खमंग चिवडा बनवण्यासाठी… हे करून पहा

सर्वात आधी पोहे, शेंगदाणे, डाळ, सुके खोबरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, मोहरी, जिरे, चवीनुसार मीठ, हळद घ्या. पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. तेलात तळून घ्या. तेलात मोहरी, जिरे आणि बडीशेप तळून घ्या. हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता परतून घ्या. शेंगदाणे आणि चणाडाळ सोनेरी रंगावर भाजून घ्या.

सुक्या खोबऱ्याचे कापही सोनेरी रंगावर तळून घ्या. एका मोठ्या भांड्यात भाजलेले पोहे घ्या. त्यात तळलेले शेंगदाणे, चणाडाळ, खोबऱ्याचे काप, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला. हळद, हिंग, मीठ आणि पिठीसाखर घालून चांगले मिक्स करा. धने, जिरे आणि बडीशेप हलके भाजून त्याची पूड तयार करा. ही पूड चिवड्यात मिसळा. चिवडा पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर तो आणखी कुरकुरीत होतो.