
‘तू ही रे माझा मितवा’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या स्टार प्रवाहवरील नव्या मालिकांचा ग्रँड लॉन्च सोहळा मुंबईत भर समुद्रामध्ये धुमधडाक्यात पार पडला. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर, अविनाश नारकर, ऋजुता देशमुख, कश्मिरा कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, प्रसन्न केतकर, संयोगिता भावे, आभा वेलणकर, विशाल कुलथे, श्रेयस कदम, स्नेहल चांदवडकर अशा अनेक दमदार कलाकारांची फौज आहे, तर ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत अभिजित आमकर आणि शर्वरी जोग यांच्या मुख्य भूमिका आहेत.