
सध्या जगात काही देशांमध्ये जोरदार संघर्ष सुरू असताना तुर्कीने एक खतरनाक बॉम्ब बनवला आहे. या बॉम्बचे नाव ‘गजप’ असे आहे. याचे वजन 970 किलोग्रॅम आहे. या बॉम्बला एफ 16 सारख्या लढाऊ विमानाने शत्रूंवर हल्ला करता येऊ शकतो. याला आयडीईएफ 2025 आंतरराष्ट्रीय मेळ्यात समोर आणले. हा बॉम्ब अमेरिकेच्या एमके84 पेक्षा तीन पट जास्त धोकादायक आहे. तुर्कीचा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक बॉम्ब मानला जात आहे.