
हिंदुस्थानच्या पायाभूत सुविधा नष्ट करणाच्या उद्देशाने आलेल्या पाकडय़ांच्या ड्रोन्सना हिंदुस्थानने हवेतच नष्ट केले. पाकिस्तानने वापरलेल्या ड्रोनच्या अवशेषांच्या फॉरेन्सिक अहवालावरून हे ड्रोन तुर्कीमध्ये निर्मिती झाल्याचे समोर आले आहे. असिसगार्ड सोनगर या सशस्त्र ड्रोनमुळे हवेतून जमिनीवर मारा करणे आणि टेहळणी करणे सोपे होते. तुर्कीची राजधानी अंकारा येथील असिसगार्ड या कंपनीने ते बनवले आहेत.
अशी आहेत ड्रोनची वैशिष्टय़े
- या एरियल ड्रोनची रुंदी 145 सेमी आणि उंची 70 सेमी आहे. त्याचे वजन 45 किलो आहे. हे ड्रोन समुद्रसपाटीपासून सरासरी 2,800 मीटर उंचीवर आणि जमिनीपासून 400 मीटर उंचीवर उडू शकतात. ड्रोनद्वारे लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग निश्चित करता येतो, त्याचबरोबर उड्डाणादरम्यान मार्ग बदलणेही शक्य. संपर्प तुटल्यास किंवा बॅटरी लो झाल्यास परत येण्याची सुविधा उपलब्ध आहे. मशीनगनने सज्ज असलेला हा तुकाaचा पहिला स्वदेशी ड्रोन आहे. तो एका मिनिटात 200 गोळ्या झाडू शकतो. तुर्की निर्मित SAR 15T रायफलसह यावर बसवली जाऊ शकते. याच्या मदतीने 400 मीटरपर्यंत लक्ष्य गाठता येते.
- पाकिस्तान-तुर्पस्तानचे लष्करी संबंध पूर्वापार आहेत. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच एकमेकांचे राजकीय समर्थक राहिले. हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत केलेल्या कारवाईविरोधात तुर्की ने भूमिका घेतली.
- हल्ल्यानंतर पाकिस्तानला तातडीने दारूगोळा पाठविण्यासाठी तुर्पस्तानची ‘सी-130 ई’ ही लष्करी मालवाहू विमाने तातडीने कराची विमानतळावर उतरली. त्या पाठोपाठ तुकाa नौदलाची ‘टीसीजी बुयुकदा’ ही युद्धनौका कराची बंदरामध्ये नांगरण्यात आली. दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने युद्धनौका कराचीला आल्याचा कांगावा पाकिस्तानी नौदलाने केला असला तरी वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानला एकाअर्थी धमकी देण्यासाठीच ही युद्धनौका कराचीला नांगरली आहे.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटय़ूटनुसार, पाकिस्तानने 2021 मध्ये तुर्कीकडून तीन बायरक्तार TB-2 सशस्त्र UAV मागवले असून 2022 साली त्यांना ते मिळाले.