राहुल गांधी यांनी केली मेक इन इंडियाची पोलखोल, देशातील टीव्हींचे 80 टक्के सुटे भाग चीनमधून येतात

देशातील टीव्हींचे तब्बल 80 टक्के सुटे भाग चीनमधून येतात. हिंदुस्थानात केवळ जोडाजोडी होते, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मेक इन इंडियाची पोलखोल केली आहे. मेक इन इंडियाच्या नावाखाली केवळ असेम्ब्लिंग सुरू आहे. हिंदुस्थान वस्तू उत्पादनात आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत रोजगार, विकास आणि मेक इन इंडियासारख्या गोष्टी केवळ भाषणांतच राहतील, असा टोली त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला.

ग्रेटर नोएडातील एका टीव्ही फॅक्टरीला राहुल गांधींनी भेट दिली. त्याचा व्हिडीओ त्यांनी एक्सवरून पोस्ट केला आहे. हिंदुस्थानात तयार होणाऱया टीव्हींचे 80 टक्के सुटे भाग चीनमधून येतात. आपण त्याचे केवळ जोडकाम करतो, आयपह्नपासून इतर अनेक वस्तूंच्या बाबतीतही हेच सुरू आहे. देशातील उद्योजक अनेक वस्तूंची निर्मिती करू इच्छितात, परंतु सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही. उलट त्यांच्यावर करांचे ओझे  लादले जाते. काही निवडक बड्या पंपन्यांवर सवलतींचा वर्षाव केला  जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.