प्रचारासाठी पुण्यातून रोज 12 हेलिकॉप्टरचे उड्डाण

राज्यात सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू आहे. 15 जानेवारीला महापालिकेसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी नेत्यांकडून हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. पुण्यात दररोज 12 हेलिकॉप्टरचे उड्डाण होत असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी सर्वात जास्त या हेलिकॉप्टरचा वापर होत आहे. मुंबईपाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आदी ठिकाणी जाण्यासाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे.