गुजरातमध्ये बंगालपेक्षा दुप्पट दुबार मतदार, SIR मध्ये कोणत्या राज्यात किती मतदारांना वगळण्यात आले?

निवडणूक आयोगाने अनेक राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्ण केली आहे. ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्याचे आकडे समोर आले आहेत. यातच सर्वाधिक नावे तामिळनाडूमध्ये कापली गेली आहेत. येथे ९७ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. या आकडेवाडीनुसार, गुजरातमध्ये बंगालपेक्षा जास्त दुबार मतदार आढळले आहेत. गुजरातमध्ये ३.८१ लाख दुबार मतदार आढळले, तर बंगालमध्ये १ लाख ३८ हजार दुबार मतदार आढळले आहेत.

निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, तामिळनाडूत ९७ लाख, बंगालमध्ये ५८ लाख, केरळमध्ये २२ लाख, मध्य प्रदेशमध्ये ४२ लाख आणि छत्तीसगढमध्ये २७ लाख नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.

आतापर्यंत कोणत्या राज्यात किती मतदारांची नावे कापली गेली?

  • केरळ २२ लाख
  • मध्य प्रदेश ४२ लाख
  • छत्तीसगढ २७ लाख
  • गुजरात ७३ लाख
  • बंगाल ५८ लाख
  • तामिळनाडू ९७ लाख
  • अंदमान २२ हजार
  • बिहार ४७ लाख
  • गोवा १.०२ लाख
  • पुदुच्चेरी ८४ हजार