प्रथा जपण्यासाठी दोन भावांचे एकाच मुलीशी लग्न

हिमाचल प्रदेशात दोन सख्ख्या भावांनी एकाच मुलीशी लग्न केल्याचे समोर आले आहे. सिरमौर जिह्यातील शिलाई गावात शेकडो वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतरांगांमध्ये ही बहुपत्नीत्वाची प्रथा आजही पाळली जाते. या प्रथेनुसार लग्न झाल्याचे सांगण्यात आले.