नवी बाईक घेताना 2 हेल्मेट बंधनकारक

नवी दुचाकी खरेदी करताना यापुढे ग्राहकांना दोन हेल्मेटही खरेदी करावी लागणार आहेत. केंद्र सरकारने यासंदर्भात नवीन नियम आणला आहे. हे हेल्मेट पुरवण्याची जबाबदारी दुचाकी उत्पादकांवर राहणार आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने 1989 च्या मोटर वाहन कायद्यामध्ये महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. त्यात दुचाकी विक्रीच्या वेळीच दोन हेल्मेट बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे.