
कॅनडामध्ये राहत असलेल्या दोन हिंदुस्थानी तरुणांना दोषी ठरवल्यानंतर प्रत्येकाला दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गगनप्रीत सिंग आणि जगदीप सिंग असे या दोन्ही आरोपींची नावे आहेत. गाडी चालवताना एका व्यक्तीला जाणिवपूर्वक धडक दिल्याचा, 1.3 किमी फरफटत नेल्याचा आणि मृतदेह रस्त्यावर फेकून पळून गेल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या शिक्षेसोबतच या दोघांना 3 वर्षांपर्यंत गाडी चालवण्यात बंदी घालण्यात आली आहे. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर या दोघांनाही कॅनडातून हिंदुस्थानात पाठवण्यात येईल.