एका 31 वर्षीय महिलेच्या पोटात 2 किलो केस सापडले आहेत. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेतून डॉक्टरांनी हे केस काढले आहेत. उत्तर प्रदेशमधली ही घटना असून गेल्या 16 वर्षांपासून ही महिला आपलेच केस तोडून खात होती.
मिळालेल्या माहितीनुसार बरेली जिल्ह्यात एका 31 वर्षीय महिलेच्या पोटात दुखू लागले. तिला बरेलीच्या महाराणा प्रताप रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया केली तेव्हा या महिलेच्या पोटातून दोन किलो केस निघाले. या महिलेला ट्रायको फोटोमेनिया नावाचा आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या 16 वर्षांपासून ती आपलेच केस तोडायची आणि खायची. अखेर डॉक्टरांनी तिच्या पोटातून हे केस बाहेर काढले आहेत. तिचे समुपदेशन करून डॉक्टरांनी तिला सोडून दिले आहे.