लडाखमध्ये लष्कराच्या वाहनावर दरड कोसळली; 2 अधिकारी शहीद तर 3 गंभीर जखमी

लडाखमध्ये लष्कराच्या वाहनावर दरड कोसळल्याची घटना बुधवारी घडली आहे. गलवानमधील चारबाग परिसरात ही दुर्घटना असून, यात लष्कराचे दोन अधिकारी शहीद झाले असून तीन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन मेजर आणि एका कॅप्टनचा समावेश आहे. जखमी सैनिकांना 153 जीएच, लेह येथे नेण्यात आले आहे. लष्कराच्या अग्निशमन आणि फ्युरी कॉर्प्सने अपघाताची पुष्टी केली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

सैनिकांचा ताफा दुर्बुकहून चोंगताशला प्रशिक्षणासाठी जात असताना बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात घडला. दुर्बुकहून चोंगताशला जात असताना चारबागमध्ये लष्करी वाहनावर दरड कोसळली. यात 14 सिंध हॉर्सचे लेफ्टनंट कर्नल मनकोटिया आणि दलजीत सिंग शहीद झाले. तर मेजर मयंक शुभम (14 सिंध हॉर्स), मेजर अमित दीक्षित आणि कॅप्टन गौरव (60 सशस्त्र) जखमी झाले.