
कॅनडाच्या मॅनिटोबामध्ये एका भीषण विमान दुर्घटनेत भारतीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. श्रीहरी सुकेश असं मृत तरुणाचं आहे. सुकेश हा शिकाऊ पायलट होता. स्टिनबॅकजवळ हार्व्स एअर पायलट स्कूलच्या रनवेजवळ प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन विमानांची हवेत धडक झाली. टोरंटोमधील भारतीय दुतावासानं या अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे.