
अल्टिमेट टेबल टेनिस (UTT) चा आणखी एक पर्व चाहत्यांसाठी रोमांचक अनुभव घेऊन येणार आहे आणि 2024च्या पर्वासाठी प्रशिक्षकांचा ड्राफ्ट पार पडला. 8 संघांनी प्रत्येकी 1 परदेशी व 1 हिंदुस्थानी अशा प्रशिक्षकांची निवड केली. अहमदाबाद एसजी पायपर्स आणि जयपूर पॅट्रियट्स या दोन संघांच्या समावेशामुळे यंदा आठ संघांमध्ये जेतेपदाची चुरस पाहायला मिळणार आहे.
ड्राफ्टमध्ये महत्त्वपूर्ण निवडी झाल्या आहेत. बंगळुरू स्मॅशर्सने नेदरलँड्सच्या एलेना टिमिना यांची निवड केली आहे. या चारवेळच्या ऑलिम्पियनपटूने गेल्या मोसमात गोवा चॅलेंजर्सला विजेतेपद मिळवून दिले होते. अहमदाबाद एसजी पायपर्सने अनुभवी फ्रान्सिस्को सँटोसची निवड केली आहे आणि ते पाचव्यांदा UTT मध्ये सहभाग नोंदवणार आहेत. दबंग दिल्ली टीटीसी आणि जयपूर पॅट्रिओट्सने अनुक्रमे सचिन शेट्टी आणि सोमनाथ घोष यांची निवड केली आहे.या हंगामात चार भारतीय प्रशिक्षक UTT मध्ये पदार्पण करणार आहेत. जय मोडक अहमदाबाद एसजी पायपर्ससह, अंशुमन रॉय बंगळुरू स्मॅशर्ससह, माजी राष्ट्रीय चॅम्पियन सुभाजित साहा गोवा चॅलेंजर्ससह आणि सुबिन कुमार चेन्नई लायन्ससह यंदाच्या पर्वातून पदार्पण करत आहेत. चेन्नई येथे 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान अल्टिमेट टेबल टेनिसचा नवीन हंगाम होणार आहे,