शरद पवार यांना विश्रांतीचा सल्ला, उद्धव ठाकरे यांनी केली प्रकृतीची विचारपूस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांना खोकल्यामुळे बोलण्यास त्रास होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पह्न करून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लवकर बरे व्हा, असे सांगितले. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली.

सर्वांच्या शुभेच्छांमुळे आणि प्रेमामुळे शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. शरद पवार यांना तीन ते चार दिवस आराम करायला सांगितले असून त्यांच्या प्रकृतीकडे डॉक्टरांकडून बारकाईने लक्ष दिले जात आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.