
अखिल भारतीय सरपंच परिषद व महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनतर्फे विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनास भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला.