शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुधवारपासून मराठवाडा संवाद दौरा, ‘दगाबाज रे’ संवाद दौऱ्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांशी साधणार संवाद

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळी अगोदर देण्याचे आश्वासन देऊन हा आनंदमय सण गोड करण्याचे अभिवचन राज्य सरकारने शेतकर्‍यांना दिले होते. दिवाळी होऊन आठवडा सरला असला तरीही शेतकर्‍यांच्या खात्यात हे नुकसान भरपाईचे अनुदान न मिळल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संपूर्ण मराठवाडा दौरा करणार आहेत. “दगाबाज रे” या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे 5, 6,7 व 8 नोव्हेंबर रोजी शेतकर्‍यांशी साधणार संवाद आहे.

बुधवार, 5 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर येथून दौऱ्याला सुरूवात करतील. बीड, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यातील गावागावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधतील. चावडी, पारावर बसून शेतकऱ्यांकडून पॅकेज मिळाले किंवा नाही, सरकारची मदत मिळाली का बद्दलची भूमिका जाणून घेतील. 6 नोव्हेंबर रोजी धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. ७ नोव्हेंबर रोजी नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतील. ८ नोव्हेंबर रोजी परभणी, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून या संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याप्रसंगी शेतकरी बांधवांनी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, बबनराव थोरात, लक्ष्मणराव वडले, ज्योतीताई ठाकरे, सचिन घायाळ, रोहिदास चव्हाण, परशुराम जाधव, सुनील काटमोरे, आमदार राहुल पाटील, कैलास पाटील, प्रविण स्वामी, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड,भास्कर आंबेकर, महेश नळगे, गणेश वरेकर, उल्हास गिराम, गंगाप्रसाद आणेराव,रविंद्र धर्मे, रणजीत पाटील, संदेश देशमुख, गोपु पाटील, ज्योतीबा खराटे, बबन बारसे व भुजंग पाटील यांनी केले आहे.