
”न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य ना्ही. मात्र कोर्टाचा आदर ठेवाव लागतो. त्यामुळे आम्ही बंद मागे घेत आहोत. मात्र आमचे आंदोलन सुरू राहणार’, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नेते हे उद्या हे शहरातील प्रत्येक चौकात तोंडाला काळ्या फिती बांधून व काळें झेंडे हातात घेऊन आंदोलन करणाऱ असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयाने बंद बाबत दिलेल्या निर्णायवप बोलताना ‘या देशात आता ‘फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन’चा अधिकार शिल्लक राहिला आहे का? असा खणखणीत सवाल देखील केला.
”माननीय उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला मनाई केली आहे. एका गोष्टीचं मला बरं वाटतं की न्यायालय इतक्या तत्परतेने हलू शकतं. हे कौतुकास्पद आहे. मी न्यायालयकडून एकाच गोष्टीची अपेक्षा करतो ज्या तत्परतेने तुम्ही निकाल दिला. तशीच तत्परता जे गुन्हे घडतायत त्या गुन्हेगारांबद्दल दाखवून त्यांना ताबडतोब सजा देण्याची तत्परता दाखवावी. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य ना्ही. मात्र कोर्टाचा आदर ठेवाव लागतो. त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयत जाऊ शकलो असतो. मात्र तिथे गेल्यानंतर त्यालाही वेळ लागू शकतो. सर्वोच्च न्यायालयात जाण्याची ही वेळ नाही. सर्वोच्च न्यायालयात जाईपर्यंत जनतेच्या मनातला जो रोष अधिक उफाळला तर अधिक कठिण होईल’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”उद्याचा बंद मागे घेतोय पण प्रत्येक चौकात तोंडाला काळ्या फिती बांधून, काळे झेंडे घेऊन निषेध करणार आहोत. बंदला तुम्ही बंद म्हटलं आता आम्ही तोंडच बंद करतो. एकूणच या लोकशाही मानणाऱ्या देशामध्ये फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन शिल्लक आहे की नाही? मोर्चे, संप, बंद, हरताळ यालाही बंदी केली आहे का? लोकांनी भावना व्यक्त करायच्या नाही का? यावर घटनातज्ज्ञांनी आपली मतं मांडली पाहिजे”, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.