उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा आणि डोळे…

सध्या हिंदू-मुस्लिम भांडणे लावली जात आहेत. भाजपचा एक बेड्कू ओरडतोय… असे उद्धव ठाकरे म्हणताच सभागृहात नेपाळी… नेपाळी… असा आवाज घुमला. त्याला तेवढंच काम दिलेलं आहे. तुझी उंची किती, तुझा आवाज कसा, उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा… असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावताच एकच हशा पिकला. डोळे कोणासारखे आहेत माहीत नाही… असे ते म्हणताच पुन्हा नेपाळी… नेपाळी… असे कानाकोपऱयातून आवाज आले. त्यावर पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, तुझा जीव काय, तू बोलतोस काय? तुझी पार्श्वभूमी काय? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? आणि शिवसेनेवर बोलतोस. पुढे बोलताना कोणता तरी एक बाप ठरवा, याच भाषेत मी त्यांना बोलतोय हे त्यांना कळू द्या. शिवसेना 59 वर्षांची झाली. तरीही आमचा नेता एकच. भगवा एकच, दैवत, विचार एकच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.