
<<< संजय राऊत >>>
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले की, ‘‘मराठी माणसांची एकजूट अभेद्य आहे. हिंदी सक्तीच्या निमित्ताने भाजप महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तसे घडणार नाही. आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही, पण कोणत्याही भाषेची सक्ती मराठी माणूस सहन करणार नाही.’’ उद्धव ठाकरे यांनी पहलगाम अतिरेकी हल्ल्याबद्दल मोदी सरकारला ‘जाब’ विचारला, ‘‘26 भगिनींचे कुंकू पुसले व अतिरेकी गायब झाले. हे सरकारचे अपयश आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ कोणाच्या दबावाखाली मागे घेतले ते देशाला सांगा.’’
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील काय? दोघांची राजकीय युती होईल काय? हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धुमाकूळ घालत आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे काय? त्यांच्या पोटदुख्या त्यांनी सांभाळाव्यात. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ.’’
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीमुळे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. लोकांच्या मनातला संभ्रम दूर झाला. दुसऱ्या भागातील चर्चा पहलगाम हल्ल्याच्या दुर्दैवी घटनेपासून सुरू झाली!
या राज्याचे प्रश्न कधीही संपणारे नाहीत; पण तरीही देशात अशा काही घडामोडी घडल्या त्यावर तुमचं मत आणि भाष्य अत्यंत महत्त्वाचं आहे…
– होय, शिवसेनेची म्हणून एक ठाम भूमिका आहेच.
खास करून पहलगामची घटना… तिथे भयंकर अतिरेकी हल्ला झाला… देशात हाहाकार उडाला… आमच्या महाराष्ट्रातल्या माताभगिनींसह 26 महिलांचं कुंकू पुसलं गेलं…
– होय, तुम्ही सांगताय ती घटना धक्कादायक आणि संतापजनक आहे, पण माझा प्रश्न असा आहे की, मुळात हा हल्ला होऊच कसा शकला? कश्मीरमध्ये परिस्थिती पूर्ववत झाली आहे असं आम्हाला सातत्याने सांगण्यात येत होतं. खरं तर ती व्हायलाच हवी. कारण कश्मीर हा आमच्या देशाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच 370 कलम काढण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला होता. अलीकडे तिथे पुन्हा पर्यटन सुरू झालं होतं. त्यामुळे पुरेसा बंदोबस्त तिथे ठेवण्याची गरज होतीच. कारण कधी काळी किंवा बराच काळ अशांत राहिलेल्या या भागाकडे तिथे सारे काही आलबेल आहे असे समजून आपण दुर्लक्ष करू शकत नाही.
मग काय व्हायला हवे होते?
– काय म्हणजे? हल्ल्याआधी गलथानपणा, गाफीलपणा किंवा दुर्लक्ष झालं त्याची जबाबदारी कोणी घेतली? कुणीच घेतली नाही. सैन्याने नंतर जी काही कारवाई केली त्यासाठी सैन्याच्या शौर्याला सलाम! त्याबद्दल वाद असूच शकत नाही. परंतु आपल्या कश्मीरात आपण जाऊ शकतो. आनंदाचे, सुखाचे क्षण आपल्या कुटुंबीयांसह तिकडे घालवू शकतो या विश्वासाने जे पर्यटक तिथे अगदी बिनधास्तपणे गेले होते त्यांच्यावर अचानक गोळीबार झाला. साऱ्यांच्या डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं झालं. माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले याला जबाबदार कोण? जिथे ही घटना घडली तो परिसर भौगोलिकरीत्या सीमेपासून किती आतमध्ये आहे. इतक्या आतमध्ये अतिरेकी आले कसे, हा खरा प्रश्न आहे.
धारावीसाठी जसे मुंबईतील मोक्याचे भूखंड अदानींच्या घशात घातलेत तसे तुम्ही माझ्या गिरणी कामगारांना का नाही दिलेत? एखादा भूखंड तुम्ही त्यांना फुकट द्या ना… त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रस्त्यावर उतरून रक्त सांडून मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली, त्यांना मुंबईत स्थान नाही. हे मधेच कुठून आले? पूर्वी मुंबई पोर्तुगीजांना आंदण दिली होती. तसं तुम्ही मुंबई अदानींना आंदण देताय? काय संबंध आहे?
या घटनेला तीन महिने झाले तरी अतिरेकी सापडणे सोडाच, त्यांचा साधा थांगपत्ताही लागलेला नाही. या अतिरेक्यांची पहिली चित्रे प्रकाशित केली गेली, नंतर म्हणे ती चित्रे बरोबर नाहीत. अतिरेकी आले, आपल्या लोकांना डोळ्यादेखत गोळ्या घालून गेले… अरे, ते मग गेले तरी कुठे?
हे सरकारचं अपयश आहे असं मानता का तुम्ही?
– मोठं अपयश आहे. कारण तुमच्याच भरवशावर आपले नागरिक तिथे गेले होते ना? कधी काय होईल हे सांगता येत नव्हतं. त्यामुळे आजपर्यंत लोकं कश्मीरमध्ये जायला घाबरतच होते. पण सरकारने सांगितले, आता कश्मीरमध्ये बदल झाला आहे. आताचं कश्मीर वेगळं आहे. आताचा हिंदुस्थान वेगळा आहे. आताचं सरकार वेगळं आहे. आता जर का कुणी काही केलं तर आम्ही घुसून मारू. पण हे काम आपलं सैन्य करतं. त्याच्या शौर्याचं श्रेय तुम्ही नका घेऊ.
मोदींनंतर कोण? याचं उत्तर त्यांनी काढलं असेल!
मोदींच्या काळात ‘पठाणकोट’ झालं. मोदींच्या काळात ‘पुलवामा’ झालं. 40 जवान त्यावेळी शहीद झाले होते…
– हो. तुम्हाला आठवत असेल, त्यावेळी तिथले राज्यपाल सत्यपाल मलिक काय बोलले होते. पण मलिक जे बोलले त्यावर नंतर कोणी काही बोलायला तयार नाही. उलट त्यांनाच गुन्हेगार ठरवलं. पुलवामात 40 जवान मारले गेले कसे? कोण जबाबदार? ते राज्यपाल मलिक यांनी सांगितले.
मोदींच्या काळात आता ‘पहलगाम’ही झालं. सातत्याने कश्मीरमध्ये अशा प्रकारे रक्त सांडलं जातंय आणि आपल्याकडून निवडणुकीसाठी म्हणून फक्त राजकीय कारवाया होतात. तसंच एक ‘ऑपरेशन सिंदूर’ झालं. आणि या ‘ऑपरेशन सिंदूर’चा आजही राजकीय प्रचार सुरू आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ला तुम्ही पाठिंबा दिलाय. असं वाटलं होतं की, ‘ऑपरेशन सिंदूर’ हे पाकिस्तानला जमीनदोस्त करेल आणि आता पाकिस्तानचं कंबरडं मोडूनच भारतीय सैन्य माघारी येईल…
– खरं आहे, कारण अशी परिस्थिती तिकडे होती. तशा बातम्या आल्या होत्या आणि येत होत्या. आपल्या सैन्याने शौर्य गाजवलं होतं.
मग आता काय?
– एकतर असा क्षण आला होता की, बस, आता उद्या आपलं स्वप्न पूर्ण होतंय… पाकिस्तानला आपण पूर्ण मोडून टाकतोय, जसा त्यावेळी इंदिराजींनी बांगलादेश पाकिस्तानपासून तोडला तसे पाकिस्तानचे आपण तुकडे करणार आहोत अशी परिस्थिती निर्माण झाली. कराचीवर हल्ला झाला, रावळपिंडी, लाहोरवर हल्ला झाला या सगळ्या बातम्या गोदी मीडियावर ऐकून आणि बघून सहाजिकच आपण सगळे आनंदात होतो की, अरे या पाकिस्तानला आपण धडा शिकवतोय. मग असं नेमकं काय घडलं, जे अजूनही गुलदस्त्यात आहे की सैन्याचे पाय तुम्ही का ओढलेत? सैन्य तर पराक्रमाची शर्थ करून घुसलं होतं. आपलं सैन्य हे भीमपराक्रमी आहे. त्यांच्या क्षमतेबद्दल कुणाच्या स्वप्नातसुद्धा शंका येणार नाही, पण मग त्यांना थांबवलं का गेलं?
आपले प्रधानमंत्रीसुद्धा शूर आहेत. ते आणि त्यांचे भक्त नेहमी म्हणतात की, त्यांची छाती 56 इंची आहे…
– पण ते अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार सांगताहेत, हिंदुस्थान आणि पाकिस्तानचं युद्ध मी थांबवलं.. मी युद्ध थांबवलं असं ते सतत बोलताहेत आणि शूर पंतप्रधान गप्प आहेत.
आतापर्यंत ट्रम्प यांनी 27 वेळा सांगितलं…
– होय. मग नेमकं काय? युद्ध का थांबलं? गेल्या अनेक वर्षांपासून कश्मीरचा प्रश्न धुमसतोय, आता पाकिस्तानने पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला घडवला. इकडे लोकांच्या जिवाशी खेळ होतोय. सैनिकांच्या जिवाशी खेळ होतोय आणि तुम्ही मात्र अमेरिकेच्या अध्यक्षांसोबत ‘डिप्लोमसी’चे खेळ करताय? इकडे जवान मरताहेत… तिकडे शेतकऱ्यांची, आपल्या देशवासीयांची मुलं जवान बनून सैन्यात जाताहेत… ही सगळी आपल्याच समाजाची मुले आहेत. त्यांच्या जिवाशी खेळ होतोय आणि यांची मुले तिकडे दुबईत जाऊन पाकिस्तानसोबतची क्रिकेट मॅच मस्त एन्जॉय करताहेत. पाकड्यांबरोबर मेजवान्या झोडताहेत.
आपण एक पाहिलं असेल की, ‘ऑपरेशन सिंदूर’ हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावामुळे मागे घेण्यात आलं. याचा अर्थ, भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कमजोर पडतोय?
– त्याचा दुसरा अर्थ काय होतो तुम्हीच सांगा.
ज्याची लोकसंख्या 140 कोटी आहे इतका महान देश, मोठा देश. तिथे एका दुसऱ्या देशाचा राष्ट्रपती आपल्यावर दबाव आणून दहशतवादाविरोधाची लढाई थांबवायला सांगतो…
– आणि ते सरळ सांगताहेत व्यापारासाठी युद्ध थांबलं. कोणाचा व्यापार? हे एकदा कळू द्या.
हा व्यापार कुणासाठी आहे?
– कुणाचा व्यापार करताहेत? कसला व्यापार करताहेत? जनतेला माहीत आहे.
देशाच्या प्रतिष्ठेपुढे व्यापार महत्त्वाचा आहे असे आपल्याला वाटते काय?
– असं त्यांना वाटतंय, या सत्ताधाऱ्यांना वाटतंय तसं. बघा ना, त्यांनी निवडणुकीचा व्यापार केला. सत्तेचा व्यापार केला आहे, आता देशाचाही व्यापार करताहेत. म्हणजे व्यापारासमोर यांना देश गौण वाटतोय.
या असल्या नेतृत्वाला तुम्ही काय म्हणाल?
– कचखाऊ आहेत. मध्यंतरी शिवसेनेचा वर्धापन दिन झाला. त्या दिवशी मी जे बोललो की, भाजपला पंतप्रधान आहे, भाजपला गृहमंत्री आहे, भाजपला संरक्षणमंत्री आहे; पण देशाला पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्रीही नाही. एक नंबरचे कचखाऊ.
पण आता तर प्रधानमंत्र्यांना बदलायचं चाललंय. मोदींना 75 वर्षे पूर्ण होताहेत…
– पंचाहत्तरीची शाल सरसंघचालक भागवतजींनी मोदींना घातलेली आहे. गम्मत आहेच!
हो. कारण त्यांनी त्यांच्या पक्षात एक नियम केला आहे की, ज्यांच्या वयाला 75 वर्षे झाली आहेत त्यांना पक्षात कोणत्याही सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. मग ते मुरली मनोहर जोशी असोत किंवा जसवंत सिंह होते… आडवाणी होते…
– बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे म्हणतात; पण यांच्याबाबतीत ती वंदावी की वाकुडी यांची पाऊले आहेत हे कळेल आता.
मोहनराव भागवत हे सगळ्यांचे प्रमुख आहेत. खास करून भाजपचे.
– तेसुद्धा आता 75 वर्षांचे झालेत.
ते स्वतः निवृत्त होण्याच्या विचारात आहेत. त्यांनी स्वतःच सांगितलंय. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो शब्द आहे, पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्त होण्याचा… तो ते पाळतील असं वाटतं का?
– म्हणूनच मी म्हटले ना की, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, की वाकडी त्यांची पाऊले हे आता कळेल. कदाचित ते निवृत्ती जाहीर करतीलही; पण परत म्हणतील, मी तुमचं मन कसं मोडणार आणि पुन्हा सक्रिय होतील. लोकांना रस्त्यावर उतरवलं जाईल. नौटंकी तर होणारच.
पंडित नेहरूंनंतर एक प्रश्न होता. ‘आफ्टर नेहरू हू?’ किंवा ‘आफ्टर इंदिरा हू?’ ‘तसं आफ्टर मोदी हू…?
– तो भाजपचा प्रश्न आहे.
देश आहे…
– हो, पण मोदींनंतर कोण हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. त्यावर कदाचित त्यांचा विचार सुरूही झाला असेल किंवा त्याचं उत्तरही त्यांनी काढलं असेल. त्यांच्याकडे उत्तर असेल म्हणूनच कदाचित मोहनजी असे बोलले असतील, ते बिना उत्तराचं नाही बोलणार.
शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तुमच्यासमोर असे काही व्हिजन आहे का, की ‘आफ्टर मोदी हू…?’
– मी एवढंच म्हणेन की, आपल्या देशात आपली मजबूत लोकशाही आहे. त्या लोकशाहीच्या माध्यमातून जो पक्ष जिंकतो, ज्याच्याकडे बहुमत असतं त्यांचा नेता हा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होतो. तो त्या पक्षाचा नव्हे, तर देशाचा आणि राज्याचा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री झाला पाहिजे. आपल्याकडे ही पद्धत अर्धी आहे. बहुमत मिळाल्यानंतर जे नेता पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होतो तो त्या पक्षापुरता मर्यादित राहतो. हे गैर आहे. तुम्ही देशाचे पालक आहात… तुम्ही राज्याचे पालक आहात… तुम्ही सर्वांशी समानतेने वागेन अशी संविधानाची शपथ घेतली आहे.
आपला देश हा संघ राज्यपद्धत आहे. अनेकता में एकता म्हणजे काय? त्या अनेकतेची जी एक गंमत आहे ती घालवून किंवा त्याची जी एकजूट आहे ती घालवून जी जबरदस्ती लादताय… म्हणूनच मी परवाच्या भाषणात बोललो की, आमचा हनुमान चालिसाला विरोध नाही, पण आमचं मारुती स्तोत्र का विसरायला लावताय? आम्ही मारुती स्तोत्र म्हणतो… तुम्ही हनुमान चालिसा म्हणा… देव एकच आहे, तो हनुमान. त्यालाच आम्ही मानतो. तुम्हीही त्यालाच मानता.
मी पण मुख्यमंत्री म्हणून ती घेतली होती. मला असं वाटतं, मी तसं वागण्याचा प्रयत्न केला. वागलो की नाही हे तुम्ही सांगायचं. माझ्या पक्षाचा प्रचार करायचा असेल तर आताच्या प्रथेप्रमाणे मी पण केला असेन, पण काही पायंडे आपण कुठेतरी तोडले पाहिजेत. मनोहर जोशी जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते, तेव्हा ते पक्षाच्या जाहीर सभांना येत नव्हते. विधानसभेचे अध्यक्ष असताना दत्ताजी नलावडेसुद्धा पक्षाच्या कार्यक्रमाला येऊन भाषणं करत नव्हते. पण पक्षाकडून काही प्रशिक्षण शिबीर ठेवलं की, लोकप्रतिनिधींनी कसे बोलायला हवे, कायदे कानून कसे असतात, सभागृहात कसं वागलं पाहिजे… तिथे ते मार्गदर्शन करायला यायचे.
हे पथ्य आपण पाळलंय. पण आताचे राज्यकर्ते पाळायला तयार नाहीत…
– खरं आहे. आता तर सरळ सगळं एकतर्फी चाललेलं आहे. जे ‘डिस्क्वॉलिफिकेशन’चे विषय आहेत ते कशा पद्धतीने हाताळले जात आहेत ते पहा… ते ‘शेड्यूल टेन’ वगैरे जे आहे त्याची कशी वाताहत लावलेली आहे हे आपण पाहतोच आहे. हे लोक संविधान मानायलाच तयार नाहीत.
उद्धवजी, हा जो सगळा विचार आपण मांडत आहात, आज देशाची सर्व बाजूंनी लुटमार सुरू आहे. रोज बँका लुटल्या जात आहेत. सार्वजनिक उपक्रम लुटले जात आहेत. देशाच्या जमिनी लुटल्या जात आहेत, जंगलं तोडली जात आहेत, म्हणजे ही लुटमारच आहे…
– लुटमार आहे खरी, पण याच्याविरुद्ध आवाज उठवला तर आता जनसुरक्षेच्या कायद्याखाली कारवाई होईल. जंगलतोड करून त्यांच्या मित्राला जमिनी देण्याच्या आड तुम्ही आलात तर तुरुंगात जाल. कारण तुम्ही जनसुरक्षा धोक्यात आणली आहे असा त्याचा अर्थ लावला जाईल. धारावीकरांनी त्यांचे हक्क मागितले तर ते तुरुंगात जातील. अदानीविरुद्ध उभे राहाल तर याद राखा. असा हा कायदा आहे.
छत्तीसगड आणि झारखंडच्या जंगलात अशा तऱ्हेने उद्योगपती घुसले आहेत…
– तिकडेच कशाला, गडचिरोलीतही घुसले आहेत.
कारण तिथे खाणी आहेत…
– खाणीच आहेत. मला तर असं कळलंय की, ते कश्मीरमध्येही घुसले आहेत. 370 काढल्याचा फायदा नक्की कोण घेत आहे पाहा.
उद्धव साहेब, देशावर दरोडे पडताहेत… त्याच प्रकारचा दरोडा लाडक्या उद्योगपतींच्या माध्यमातून आपल्या मुंबईवरही पडतो आहे. तुम्ही याकडे कसं पाहताय?
– मला वाटतं, मुंबईकरांनी एकवटून याचा विरोध केला पाहिजे. याचं कारण, ही एकाधिकारशाही आहे. म्हणजे बघा की, तुमच्या घरात वीज एकच माणूस देणार… तुमचा चेक पण तोच देणार… तुमच्या घरातलं सगळं काही तोच देणार… याचा अर्थ, तुम्ही त्याचे गुलाम किंवा अंकित होणार. आणि मूळचा जो मुंबईकर आहे, मराठी माणूस आहे तो मुंबईबाहेर फेकला जाणार. नुकताच गिरणी कामगारांचा मोर्चा आझाद मैदानावर आला होता. आता सरकार म्हणतंय की, आम्ही त्यांना मुंबईत घरं देणार. माझं तर म्हणणं आहे की, धारावीत तुम्ही गिरणी कामगारांना घरे का देत नाही? कुर्ला मदर डेअरीची जी जागा आहे, जी धारावीच्या पुनर्विकासासाठी दिली आहे तिथे गिरणी कामगारांना घरं का नाही देत? गिरण्यांच्या जमिनीच्या संदर्भात जो काही नियम किंवा कायदा होता त्यात स्पष्टपणे नमूद केलं होतं की, गिरण्यांच्या वापराखेरीज त्याचा अन्य कामासाठी उपयोग करता येणार नाही. पण त्यात ‘चेंज ऑफ यूजर’ करून पुन्हा ‘वनथर्ड… वनथर्ड’ केलं गेलं. त्या वनथर्डमध्ये गिरणी कामगारांना घरं देण्याचं ठरवलं गेलं होतं. पण तेही झालं नाही. तिथे आता मोठे टॉवर्स उभे राहिले, मॉल उभे राहिले आणि गिरणी कामगार हा देशोधडीला लागला.
आधी गिरणी कामगार फसला आणि आता या मुंबईतला उरलासुरला मराठी माणूस फसवला जातोय. आणि हे सगळं गौतम अदानी नावाच्या उद्योगपतीसाठी… कायदे बदलले जाताहेत, नियम बदलले जाताहेत, सर्वकाही बदललं जातंय…
– ते दिसतंच आहे. मला एक सांगा, हे सरकार अदानीला धारावीसाठी कुर्ल्याच्या मदर डेअरीची जमीन फुकटात देतंय. देवनारचं डंपिंग ग्राऊंड दिलं. कांजूरमार्गची जमीन आहे. तिचंही तेच होतंय. मुंबईची मिठागरं देत आहेत. म्हणजे मुंबई गेलीच ना.
धारावी हा आता मुंबई, महाराष्ट्रातला नव्हे, तर देशातला मोठा जमीन घोटाळा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा ‘लॅण्डस्पॅम’ या धारावी पुनर्वसन प्रकल्पातून सुरू होतोय. याआधी महाराष्ट्रात पुनर्वसन प्रकल्प झाले आहेत. हा प्रकल्प नवीन नाही. धारावी तुम्ही अदानीला दिल्यावर त्याच्यावर सर्वच स्तरांवरून जो सवलतींचा वर्षाव सुरू आहे आणि त्यांच्यावर मुंबईतील भूखंडाची मेहेरबानी दिली जात आहे. ते यापूर्वी कधी झालं नव्हतं… ते का होतंय?
– ते सत्ताधाऱ्यांचे मित्र आहेत म्हणून ना… म्हणूनच मी मघाशी सांगत होतो की, धारावीसाठी जसे मुंबईतील मोक्याचे भूखंड अदानींच्या घशात घातलेत तसे तुम्ही माझ्या गिरणी कामगारांना का नाही दिलेत? एखादा भूखंड तुम्ही त्यांना फुकट द्या ना… त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रस्त्यावर उतरून रक्त सांडून मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली, त्यांना मुंबईत स्थान नाही. हे मधेच कुठून आले?
मी आतासुद्धा फोन उचलून त्याला फोन करू शकतो. तो मला फोन करू शकतो, आम्ही आता भेटू शकतो. अडचण काय आहे? बाकीचे लोक एकमेकांना चोरूनमारून भेटतात. आम्ही चोरूनमारून भेटणाऱ्यांतले नाहीत. मुलाखतीच्या सुरुवातीलाच बोललात ना की ‘ठाकरे ब्रॅण्ड’ वेगळा आहे. ठाकरे काही चोरूनमारून करत नाहीत. भेटायचं असेल तर उघडपणे भेटू. याची अडचण काय कुणाला?
पूर्वी मुंबई पोर्तुगीजांना आंदण दिली होती. तसं तुम्ही मुंबई अदानींना आंदण देताय? काय संबंध आहे? सगळंच तुम्ही त्यांना देताय. देवनारचं डंपिंग ग्राऊंडही दिलं. हा तर कहरच झाला. त्या डंपिंग ग्राऊंडवरचा कचरा उचलण्यासाठी महापालिकेचे 2700 कोटींचे टेंडर आहे. आता जी काही माहिती मिळाली आहे त्यानुसार कचरा साफ करण्याचा टॅक्स नागरिकांवर लावला जाणार आहे. एवढचं नव्हे तर पुढचं जे कळलंय ते भयानक आहे. देवनारच्या डंपिंगची साफसफाई करणारी कंपनीही अदानींचीच आहे.
म्हणजे हा देश अदानी चालवताहेत?
– अदानी चालवत आहेत किंवा अडाणी चालवत आहेत… काहीही म्हणा.
मुंबईसारख्या शहराचा सातबारा अदानींच्या नावावर झाला?
– हे सगळं करता यावं म्हणूनच तर त्यांनी शिवसेना तोडली ना… आता तुमच्या लक्षात येईल की, ज्या शिवसेनेने मुंबईसाठी कधी तडजोड केली नाही ती शिवसेना तोडण्याचा, चोरण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न या लोकांनी एवढ्यासाठीच केला. नाहीतर धारावीचा पुनर्विकास मीही करत होतो. धारावीचे एक वैशिष्ट्य आहे, धारावीत प्रत्येक घरात एक उद्योग आहे. त्याला अगदी मायक्रोस्केल म्हणा ना.
जगातले अनेक ब्रॅण्ड तिथे पाहायला मिळतात…
– अनेक आणि छोटे छोटे ब्रॅण्ड. उद्योगासह त्यांना राहतं घर तिकडेच मिळायला हवं. आता तिकडे सर्व्हे सुरू केला आहे. आतापर्यंत जो सर्व्हे झालाय तो कदाचित हजारात असेल की शेकड्यात असेल… माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंतच्या सर्व्हेत तिथल्या 80 टक्के लोकांना अपात्र ठरवण्यात आलंय. हे जर असंच पुढे गेलं तर धारावीत फार कमी लोकं उरतील.
मराठी माणसांचं एक वैशिष्ट्य आहे, मराठी माणूस हा आततायीपणा करणारा नाही. मराठी माणूस हा विघ्नसंतोषी नाही. मराठी माणूस हा इतर वेळेला मी बरं आणि माझं काम बरं असा असतो. कोणावरही अन्याय करत नाही. हाच मराठी माणूस जर त्याच्यावर अन्याय झाला तर सहनही करत नाही. आता सहनशीलतेचा कडेलोट व्हायला लागला म्हणूनच मराठी माणूस पिसाळलाय, जसा संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळेला तो पेटला होता. तसाच तो आता पेटलेला आहे. कारण किती काळ हे सहन करायचं?
जगातले अनेक ब्रॅण्ड बनवणाऱ्या या लोकांना जर कोणी म्हणत असेल की, अरे तू या एका खोलीत का मरतोयस? तुझं आयुष्य एका खोलीत गेलं. तू त्या देवनारच्या डंपिंग ग्राऊंडवर जा. तुला दोन खोल्या देतो तर कसं चालेल? बरं, तिथल्या लोकांना काढून हे अख्खी धारावी साफ करणार, धारावीत टॉवर बांधणार. त्या टॉवरमध्ये मराठी माणूस असेल का, हा प्रश्न आहे. त्याच धारावीच्या बाजूला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सची जी जागा आहे तिथे अहमदाबादला जाणाऱ्या बुलेट ट्रेनचे स्टेशन हा निव्वळ योगायोग समजायचा काय? एवढं सगळं ढळढळीत वास्तव डोळ्यासमोर आहे, धारावी रिकामी केली जातेय. आज तिथल्या जागेच्या किमती काय आहेत ते पहा. त्या किमतीत मराठी माणूस किंवा जो मुंबईकर आहे तो घर घेऊ शकणार नाही. मग तिकडच्या टॉवरमध्ये येणार ते कोण येणार? त्यांच्यासाठीच अहमदाबादला जाण्यासाठी बुलेट ट्रेनचे स्टेशन उभारले जातेय.
धारावीच्या नावाखाली वांद्रे रिक्लेमेशनची जागा अदानीला दिली आहे. मिठागरांच्या जमिनी अदानीला मिळताहेत. मदर डेअरीचा भूखंड अदानीला मिळतोय…
– माझं म्हणणं हेच आहे की, वांद्रे रिक्लेमेशनची जी जागा आहे, तिथे का नाही धारावीकरांना घरे देत? त्यांना देवनार डंपिंग ग्राऊंडला हलवण्यापेक्षा माहीम कॉजवेजवळची रिक्लेमेशनची जागा आहे ना, ती धारावीकरांना द्या आणि तुमचे टॉवर देवनार डंपिंग ग्राऊंडवर बांधा.
दहिसरच्या टोलनाक्याच्या जमिनी अदानीला मिळताहेत…
– एवढंच नाही, कांजूरची जागाही दिली आहे. पहिल्यांदाच असा मिठागरांचा उपयोग केला जातोय. जी कांजूरची जागा आपण आपल्या मेट्रोसाठी वापरणार होतो… मागत होतो… पण दिली नाही. कोर्टात केंद्र सरकार अडून बसलेलं. आपलं सरकार पाडलं. आरेचं जंगल कापलं. तिकडे मेट्रोची कारशेड करणार आणि कांजूरची जागा अदानीला देणार. अशा पद्धतीने पर्यावरणाचा आणि मुंबईच्या सुव्यवस्थेचा खात्मा करणार. एवढी सगळी लोकसंख्या वाढल्यानंतर याचं सांडपाणी वाहून नेण्याचा भार कोणावर येणार? यांना पिण्याचं पाणी कोण देणार? रस्ते कुठून आणणार?
अशा पद्धतीने या महाराष्ट्राच्या राजधानीवरचा उरलासुरला जो मराठी ठसा आहे तो पुसण्याचा प्रयत्न होतोय…
– तेच तर चाललंय… त्यालाच तर आम्ही विरोध करतोय. म्हणून शिवसेना फोडली.
हा विरोध फक्त शाब्दिक दिसतोय…
– केवळ शाब्दिक नाही, तर तिथे जाऊन जे जे धारावीकरांसाठी करायचे आहे ते आम्ही करतोय. आणि ज्यांच्यासाठी लढतोय तो मराठी माणूस आता एकत्र यायला लागला आहे.
आता महाराष्ट्रात, खास करून मुंबई आणि आसपासच्या उपनगरात लादलेल्या हिंदी सक्तीविरोधात महाभारत घडताना दिसतंय. आणि कधी नव्हे तो मराठी माणूस या प्रश्नावरती एकवटलाय. ही जाग कशी आली?
– मराठी माणसांचं एक वैशिष्ट्य आहे, मराठी माणूस हा आततायीपणा करणारा नाही. मराठी माणूस हा विघ्नसंतोषी नाही. मराठी माणूस हा इतर वेळेला मी बरं आणि माझं काम बरं असा असतो. कोणावरही अन्याय करत नाही. हाच मराठी माणूस जर त्याच्यावर अन्याय झाला तर सहनही करत नाही. आता सहनशीलतेचा कडेलोट व्हायला लागला म्हणूनच मराठी माणूस पिसाळलाय, जसा संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळेला तो पेटला होता. तसाच तो आता पेटलेला आहे. कारण किती काळ हे सहन करायचं? आमची चूक काय असं त्याला वाटू लागलंय.
शिवसेनेचा हिंदी भाषेला विरोध नव्हता…
– शिवसेनाप्रमुखही तेच सांगायचे, माझे आजोबाही तेच सांगायचे. जितक्या भाषा तुम्हाला शिकायच्या आहेत तितक्या भाषा तुम्ही शिका. पण कुणावरही जबरदस्ती करू नका. तुम्ही स्वतः राज्यसभेत हिंदीत बोलता. मीडियासमोर असताना जर मला हिंदीत विचारलं, तर मी हिंदीत उत्तर देतो. आम्ही हिंदीचा द्वेष करत नाही, पण हिंदीची सक्ती नकोच. तुम्ही वन नेशन-वन इलेक्शन, सगळंच वन…वन…वन… वन… करत चाललेला आहात. आपला देश हा संघ राज्यपद्धत आहे.
आम्ही महाराष्ट्रात मराठी आहोत, पण देशाचा विचार केला तर हिंदू आहोत, गुजरातमध्ये आम्ही गुजराती आहोत. पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत. बंगालमध्ये आम्ही बंगाली आहोत, पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत. तसंच आम्ही त्या त्या भाषेचा आणि त्या त्या प्रांताचा मान राखतोच. प्रादेशिक अस्मितेचा मान आणि अभिमान असलाच पाहिजे. पण जेव्हा देशाचा विचार करतो तेव्हा आम्ही हिंदू म्हणून एकत्र आहोत. देशप्रेमी म्हणून एकत्र आहोत.
अनेकता में एकता म्हणजे काय? त्या अनेकतेची जी एक गंमत आहे ती घालवून किंवा त्याची जी एकजूट आहे ती घालवून जी जबरदस्ती लादताय… म्हणूनच मी परवाच्या भाषणात बोललो की, आमचा हनुमान चालिसाला विरोध नाही, पण आमचं मारुती स्तोत्र का विसरायला लावताय? आम्ही मारुती स्तोत्र म्हणतो… तुम्ही हनुमान चालिसा म्हणा… देव एकच आहे, तो हनुमान. त्यालाच आम्ही मानतो. तुम्हीही त्यालाच मानता.
आज यानिमित्तानं महाराष्ट्र विरुद्ध इतर राज्यं असा संघर्ष पेटलाय…
– पेटवण्याचा प्रयत्न भाजप करतोय. पण तो पेटत नाहीये. याचं कारण, आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. जसं आम्ही इतरत्र मराठी लादण्याचा आग्रह करत नाही तसं आमच्यावर दुसरी भाषा लादण्याचा आग्रह धरू नका.
हा तुमचा मुद्दा अत्यंत बरोबर आहे. गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही…
– याच्या पलीकडे जाऊन सांगतो, शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन केली ती इथल्या भूमिपुत्र मराठी माणसासाठी. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या भाषणातली वाक्यं आहेत, आम्ही महाराष्ट्रात मराठी आहोत, पण देशाचा विचार केला तर हिंदू आहोत, गुजरातमध्ये आम्ही गुजराती आहोत. पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत. बंगालमध्ये आम्ही बंगाली आहोत, पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत. तसंच आम्ही त्या त्या भाषेचा आणि त्या त्या प्रांताचा मान राखतोच. प्रादेशिक अस्मितेचा मान आणि अभिमान असलाच पाहिजे. पण जेव्हा देशाचा विचार करतो तेव्हा आम्ही हिंदू म्हणून एकत्र आहोत. देशप्रेमी म्हणून एकत्र आहोत.
हिंदी सक्तीविरुद्ध शिवसेना आणि मनसे… उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असा एकत्रित मोर्चा 5 जुलैला काढण्याचे जाहीर झाले. संपूर्ण देशभरात त्याची चर्चा झाली. या सगळ्या 20 वर्षांच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले…
– आम्ही एकत्र आल्यामुळे प्रॉब्लेम कुणाला आहे?
प्रॉब्लेम कुणालाच नाही, पण काही लोकांना असू शकतो…
– मग त्यांचा प्रॉब्लेम ते बघतील, आपण का विचार करायचा?
या एकत्र मोर्चाच्या चर्चेने मराठी अस्मितेची एक लाट निर्माण झाली… आणि या लाटेने उद्धव आणि राज यांना 20 वर्षांनंतर एकत्र आणलं…
– आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनासुद्धा आनंद झाला. मी तर स्पष्टच सांगतो की, अगदी मुसलमान बांधवांनादेखील आनंद झाला. ते जाहीरपणाने आनंद व्यक्त करतायत. गुजराती आणि हिंदी वगैरे इतर भाषिकसुद्धा म्हणाले, ‘अच्छा किया आपने’. त्यांना झालेला हा आनंद मी बघतो. पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे. त्याकडे मी दुर्लक्ष करतो.
कुणाची माय व्यायली आहे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी!
यात पोटशूळ उठावं असं काय आहे? पण तो उठलाय…
– मला काय माहीत. ज्यांचा पोटशूळ उठलाय त्यांना विचारा. मी आनंदाकडे बघतो. मी यातली पॉझिटिव्ह बाजू बघतो.
आपण दोघे एकत्र आल्यामुळे सरकारला माघार घ्यावी लागली…
– होय, नक्कीच.
आणि त्यानंतर या मोर्चाचं रूपांतर एका विराट अशा विजयी मेळाव्यात झालं. हा विजयी मेळावा केवळ वरळीत नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला…
– संपूर्ण देशभरात झाला. मी मघाशी सांगितलं की, महाराष्ट्र विरुद्ध इतर राज्यं असं अजिबात झालेलं नाही. जे काही मोजके असतील त्या इतर भाषिकांनीसुद्धा आम्हाला मेसेज पाठवले किंवा निरोप पाठवले की, ‘बहोत अच्छा किया आपने’. यात मुंबईतले अमराठीसुद्धा आहेत. त्यांनीही सांगितलं की, तुम्ही असं लढलंच पाहिजे. एकत्रित लढे दिले पाहिजेत.
त्या मंचावर राज ठाकरे असे म्हणाले की, बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते साकार होईल. तुम्हीही असं वारंवार म्हणालात की, लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू. याचा अर्थ महाराष्ट्राने काय घ्यायचा?
– लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू असाच याचा अर्थ आहे.
मराठी माणसाने मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणं हे ठीक आहे. ते होणार…
– आलं पाहिजे. कारण शेवटी आम्ही कोणासाठी लढतोय? मराठी माणसासाठीच.
लोकांचा रेटा आहे की, राजकीयदृष्ट्या एकत्र यावं…
– आता 20 वर्षांनी एकत्र आलोय. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असं नाही. मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे.
यासंदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे का?
– चर्चाही होईल… पण त्याआधी आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय. हेही नसे थोडके! हे खूप मोठे आहे. म्हणून मी त्या दिवशीच्या भाषणात म्हटले की, आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे.
उद्धवसाहेब, मुंबईसह 27 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. निवडणुका होतील की नाही याची अजूनही लोकांना खात्री वाटत नाही. कारण गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळ या महापालिका प्रशासन चालवत आहे. जी या राज्याची राजधानी आहे त्या मुंबई महानगरपालिकेतसुद्धा प्रशासकाचे राज्य आहे. तिथे वेगवेगळ्या मार्गाने प्रचंड लूट सुरू आहे. या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा त्या आपण कशा प्रकारे लढणार आहात?
– निवडणूक ही जिंकण्याच्या उद्देशानेच लढावी लागते आणि तशीच लढणार आहोत.
त्यात महाविकास आघाडी आहे?
– आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मध्यंतरी काँग्रेसशी बोलणं झालं. तर त्यांचं म्हणणं आहे की, कदाचित ते स्थानिक पातळीवर निर्णय घेतील. ठीक आहे. तसं असेल तर तसं करू.
अशी चर्चा सुरू आहे की, शिवसेना आणि मनसे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी भविष्यात एकत्र येऊन राजकीय निर्णय घेतला तर मविआचे काय होणार हा एक प्रश्न त्यात निर्माण होतो. मुंबई हा एक स्वतंत्र विषय आहे. ठाणे स्वतंत्र विषय आहे…
– हे पहा, मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीयदृष्ट्याही कदापिसुद्धा वेगळी समजत नाही. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचा वेगळा आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही. राज्य म्हणून प्रत्येक महापालिकेची स्वायत्तता आहे. तिथे प्रत्येक ठिकाणी जसं शिवसेनेचं युनिट आहे तसं इतर पक्षांचंही आहे. त्यांना राजकीयदृष्ट्या जे योग्य वाटत असेल तसेच करू. लढायचं तर नक्कीच आहे.
लुटमार आहे खरी, पण याच्याविरुद्ध आवाज उठवला तर आता जनसुरक्षेच्या कायद्याखाली कारवाई होईल. जंगलतोड करून त्यांच्या मित्राला जमिनी देण्याच्या आड तुम्ही आलात तर तुरुंगात जाल. कारण तुम्ही जनसुरक्षा धोक्यात आणली आहे असा त्याचा अर्थ लावला जाईल. धारावीकरांनी त्यांचे हक्क मागितले तर ते तुरुंगात जातील. अदानीविरुद्ध उभे राहाल तर याद राखा. असा हा कायदा आहे.
महाराष्ट्र, मराठी, महाराष्ट्र धर्म… त्यात परत सांगतो, याचा अर्थ कोणत्याही राज्याचा अथवा भाषेचा द्वेष नक्कीच नाही. मुंबईत अनेक भाषिक राहतात. मी मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या काळात त्यांना वेगळी वागणूक दिली होती का? मी हिंदुत्ववादी आहेच, पण म्हणून मी मुसलमानांना वेगळं वागवलं होतं? सावत्र वागणूक दिली होती? मुंबई महापालिका म्हणून जेव्हा कारभार आम्ही केला तेव्हा पाणीसुद्धा सगळ्यांच्या घरात दिलं.
मुंबई महापालिका प्रदीर्घ काळ शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेनेचा पिंवा मराठी माणसाचा भगवा झेंडा या महापालिकेवर फडकलेला आहे…
– तो तसाच फडकणार आहे, परत एकदा फडकणार आहे.
मराठी माणसाच्या हातात मुंबई राहू नये यासाठी आता ज्या प्रकारे कोंडी केली जात आहे, ज्या प्रकारचं राजकारण केलं जात आहे…
– हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. ज्यांना काही किंमत नाही अशा लोकांकडून मराठी माणसांना आणि इतर भाषिकांना पेटवण्यासाठी आव्हानाची भाषा केली जातेय. याचा आम्हाला काडीचा फरकच पडत नाही. इथले जे मराठी आणि अमराठी भाषिक आहेत ते सगळे गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
शेवटी ते मुख्यमंत्री आहेत. मानो या ना मानो… त्यांच्याकडून चांगलं व्हावं हीच अपेक्षा आहे. आजसुद्धा आहे. उलट माझं तर म्हणणं आहे की, आता ज्या काही त्यांच्या सहकारी मंत्र्यांची भांडणं, लफडी बाहेर येताहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत. हे मी त्यांना आमचे कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय. आणि हा टोमणा नाही, हा सल्ला आहे हे आधीच स्पष्ट करतो. ते जर नीती वगैरे या गोष्टी पाळत असतील तर जे काही त्यांच्या आजूबाजूला चाललेलं आहे, ते त्यांच्या प्रतिमेला तडा देणारे काम आहे. कालसुद्धा त्यांच्या मंत्र्यांसमोरची नोटांनी भरलेली बॅग तुम्हीच दाखवलीत. एकाने धक्का‘बुक्की’ केली. कुठे जमिनी लाटल्या जात आहेत. कुठे इनाम म्हणून जमीन दिली जात आहे. कुठे तीन हजार कोटींची वीजचोरी सुप्रीम कोर्ट पकडून देतंय. हे जे काही सगळं सुरू आहे त्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत.
शिवसेना जेव्हा रक्तदान शिबीर आयोजित करते तेव्हा ते रक्त केवळ विशिष्ट भाषिकाला द्यायचं म्हणून देत नाही. ते रुग्णाला जातं. जसं मी म्हटलं की, कोरोनामध्ये सगळ्या देशाने, सुप्रीम कोर्टाने, अगदी न्यूयॉर्कपर्यंत आपल्या राज्याचं कौतुक झालं. तेव्हा कुठे मी भाषिक वाद केला होता? कुठे मी धार्मिक वाद केला होता? इकडे जे सगळे गुण्यागोविंदाने नांदताहेत ते बघवत नाही. कारण सगळे जोपर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत त्यांचं काही चालणार नाही. म्हणून आता हा अत्यंत घृणास्पद वाद पेटवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.
उद्धवजी… तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो…
– मीसुद्धा थेट उत्तर देतोय.
मुंबईच्या, मराठी माणसाच्या लढ्याच्या सगळ्या घडामोडींमध्ये आणि येणाऱ्या महापालिकेसंदर्भातसुद्धा राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का?
– मला तेच कळत नाही की, मी जर थेट चर्चा केली तर कुणाला काय अडचण आहे?
काहीच अडचण नाही, पण हा प्रश्न विचारला जातोय…
– हो… पण मी आतासुद्धा फोन उचलून त्याला फोन करू शकतो. तो मला फोन करू शकतो, आम्ही आता भेटू शकतो. अडचण काय आहे? बाकीचे लोक एकमेकांना चोरूनमारून भेटतात. आम्ही चोरूनमारून भेटणाऱ्यातले नाहीत. मुलाखतीच्या सुरुवातीलाच बोललात ना की ‘ठाकरे ब्रॅण्ड’ वेगळा आहे. ठाकरे काही चोरूनमारून करत नाहीत. भेटायचं असेल तर उघडपणे भेटू. याची अडचण काय कुणाला?
महाराष्ट्रातल्या प्रश्नांसंदर्भात कधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा होते का?
– भेट नाही झाली. सुरुवातीला एकदा जाऊन मी त्यांना पुष्पगुच्छ दिला होता. विधिमंडळात भेटीगाठी व्हायला हरकत नसावी.
त्याचंही फार मोठं राजकारण झालं…
– गेलो होतो भेटायला… शेवटी ते मुख्यमंत्री आहेत. मानो या ना मानो… त्यांच्याकडून चांगलं व्हावं हीच अपेक्षा आहे. आजसुद्धा आहे. उलट माझं तर म्हणणं आहे की, आता ज्या काही त्यांच्या सहकारी मंत्र्यांची भांडणं, लफडी बाहेर येताहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत. हे मी त्यांना आमचे कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय. आणि हा टोमणा नाही, हा सल्ला आहे हे आधीच स्पष्ट करतो.
आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनासुद्धा आनंद झाला. मी तर स्पष्टच सांगतो की, अगदी मुसलमान बांधवांनादेखील आनंद झाला. ते जाहीरपणाने आनंद व्यक्त करतायत. गुजराती आणि हिंदी वगैरे इतर भाषिकसुद्धा म्हणाले, ‘अच्छा किया आपने’. त्यांना झालेला हा आनंद मी बघतो. पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे. त्याकडे मी दुर्लक्ष करतो.
ते जर नीती वगैरे या गोष्टी पाळत असतील तर जे काही त्यांच्या आजूबाजूला चाललेलं आहे, ते त्यांच्या प्रतिमेला तडा देणारे काम आहे. कालसुद्धा त्यांच्या मंत्र्यांसमोरची नोटांनी भरलेली बॅग तुम्हीच दाखवलीत. एकाने धक्का‘बुक्की’ केली. कुठे जमिनी लाटल्या जात आहेत. कुठे इनाम म्हणून जमीन दिली जात आहे. कुठे तीन हजार कोटींची वीजचोरी सुप्रीम कोर्ट पकडून देतंय. हे जे काही सगळं सुरू आहे त्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत.
होय, ते नेते आहेत…
– म्हणूनच त्यांच्या अधिपत्याखाली हे भ्रष्टाचार होतायत असा अर्थ होतो. आपण म्हणतो ना, दिव्याखाली अंधार. तसाच हा प्रकार आहे.
आज महाराष्ट्राची अनेक क्षेत्रांत पीछेहाट होताना दिसतेय. महाराष्ट्राला भविष्य आहे का?
– भविष्य नक्कीच आहे. असं थकून कसं चालेल? महाराष्ट्र लोकसभेच्या वेळी जसा जागा झाला होता, तसाच तो परत जागा झाला पाहिजे. नाहीतर त्यावेळेला आम्ही जे सांगत होतो की, महाराष्ट्रातील सगळे उद्योग गुजरातला नेले. मराठी माणूस मुंबईतून बाहेर काढला जातोय ते तसंच सुरू राहील. आता जर जाग आली नाही तर आपले डोळे कधीच उघडणार नाहीत.
या मुलाखतीच्या निमित्ताने तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय संदेश द्याल?
– जागे व्हा आणि जागे रहा. कोणावर अन्याय करू नका आणि तुमच्यावर अन्याय झाला तर तो सहन करू नका. जे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं तेच मीही सांगतोय. आणि पुन्हा एकदा ते जे बोलले होते ते सांगतो, मराठा विरुद्ध मराठेतर, ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर, 96 कुळी विरुद्ध 92 कुळी, स्पृश्य विरुद्ध अस्पृश्य, घाटी विरुद्ध कोकणी हे सर्व भेदाभेद गाडून उभे रहा. नाहीतर मघाशी जो विषय झाला की, मराठा समाजाला भडकवलं जातंय तेच पुन्हा होईल. भाजपची जी नीती आहे की, राज्यातल्या सगळ्या मोठ्या समाजाला आधी भडकवायचं. तो पेटला की त्याच्याविरुद्ध त्या समाजाव्यतिरिक्त जे समाज आहेत त्यांना चिथवायचं. जसं त्यांनी गुजरातमध्ये केलं, पटेलांना भडकवलं आणि पटेलेतरांना एकवटून सत्ता जिंकली. हरियाणात जाट समाजाला भडकवलं. त्यावेळी असं वाटलं, भाजपा आता गेलीच. कारण जाट आता पेटलाय. जाट बिचारे तिरीमिरीत पेटून उभे राहिले. तेव्हा जाटांची भीती दाखवून इतर समाजाला एकवटवलं. महाराष्ट्रात त्यांनी बटेंगे तो कटेंगे केलं, आपल्याला वाटलं, हिंदू-मुस्लिम. त्यांनी मराठा-मराठेतर केलं. मराठा समाजाच्या विरोधात ओबीसींना तयार केलं. मराठी भावंडांमध्येच समाजाच्या भिंती उभ्या करून आग लावायची आणि आपली पोळी भाजायची. हे जे भाजपचं राजकारण आहे ते हाणून पाडा.
ज्या पद्धतीचं व्यापारी राजकारण देशात, महाराष्ट्रात सुरू आहे ते पाहता मुंबई महाराष्ट्रात राहील याची आपल्याला खात्री आहे?
– कोणाची माय व्यायली आहे? मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी कोणाची माय व्यायली आहे बघूच!
(समाप्त)