पुतीनला मोठा धक्का, युक्रेनी सैन्याने रशियाची 74 गावे घेतली ताब्यात

दोन लाख लोकांनी घरे सोडली, युक्रेन आणि रशिया यांच्यात घनघोर युद्ध सुरू आहे. छोटेसे समजले जाणारे युक्रेन बलाढय़ रशियावर भारी पडत आहे. युक्रेन सैन्यांनी रशियाच्या कुर्स्क भागातील 74 गावे ताब्यात घेतली आहेत. युक्रेनचे सैन्य पुढे जात आहे आणि रशियन सैन्याला ताब्यात घेत आहे, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दिली. युक्रेनने अचानक केलेल्या हल्ल्यानंतर दोन लाख रशियन नागरिकांना घर सोडून पळून जावे लागले आहे. त्यांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. युक्रेनने 6 ऑगस्ट रोजी रशियाच्या कुर्स्क भागावर हल्ला केला. 13 ऑगस्टपर्यंत त्यांनी 1000 चौरस किमी क्षेत्र काबीज केले आहे.

हिंदुस्थानींसाठी सरकारचा अलर्ट

हिंदुस्थानने रशियामध्ये राहणाऱया नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे. बेल्गोरोड, कुर्स्क आणि ब्रायन्स्क भागात राहणाऱया नागरिकांनी हे भाग सोडून सुरक्षित ठिकाणी जावे, असे सांगितले. हिंदुस्थानी दूतावासाने एक ई-मेल जारी केला – [email protected] व हेल्पलाईन दूरध्वनी +7 9652773414 जारी केला आहे.

रशियाकडून 2.8 अब्ज डॉलरचे कच्चे तेल आयात

हिंदुस्थानने जुलै महिन्यात रशियाकडून 2.8 अब्ज डॉलरचे कच्चे तेल खरेदी केले. चीन नंतर सर्वात जास्त तेल खरेदी करण्यात हिंदुस्थान दुसरा देश ठरला आहे. या कच्च्या तेलातून पेट्रोल आणि डिझेल सारख्या इंधनची निर्मिती केली जाते. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (सीआरईए) च्या एका रिपोर्टनुसार, चीनने रशियाकडून 47 टक्के तेल खरेदी केले तर हिंदुस्थानने 37 टक्के, यूरोपीय संघ 7 टक्के, तुकाa 6 टक्के तेल खरेदी केले. गेल्या काही वर्षांत कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत.