केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कुख्यात गुंड निलेश घायवळ याला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे. अजित पवारांच्या विधानाचा संदर्भ देत सपकाळ यांनी म्हटले आहे की हा अत्यंत गंभीर प्रकार असून यामध्ये पासपोर्ट कायदा 1967 चा भंग झाल्याची बाब समोर येत आहे.

सपकाळ यांनी सांगितले की, कुख्यात गुन्हेगारांना परदेशात जाण्यास मदत करणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणे होय. त्यामुळे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.