निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदार, अधिकाऱ्यांना सोडणार नाही; गुजरातमधील पूल दुर्घटनेवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा इशारा

nitin-gadkari
नितीन गडकरी

वडोदरा जिह्यातील महिसागर नदीवरील पूल कोसळून 19 जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना ठोकले पाहिजे, अशा लोकांच्या मी मागे लागलो असून त्यांना सोडणार नाही, असा इशारा दिला आहे.

अपघात वेगळी गोष्ट आहे; परंतु जे कामात बेइमानी आणि घोटाळा करतात ती वेगळी गोष्ट आहे. जर चूक जाणूनबुजून केली नाही तर त्यांना माफ करायला हवे; परंतु चुका दुर्भावनापूर्ण असेल तर मात्र त्यांना ठोकलेच पाहिजे, असे गडकरी म्हणाले. कामात जर काही गडबड झाली तर मी अधिकारी आणि कंत्राटदारांना सोडत नाही, असेही गडकरी म्हणाले.

सध्या कामांचा पाठपुरावा घेत आहे

जर काही चूक झाली तर त्यासाठी जबाबदार लोकांनी मी फटकारतो. जर रस्त्यावर काही चूक झाली तर मी त्यांना सोडत नाही. सध्या माझे लक्ष्य 7 विश्वविक्रम करण्याचे असून विविध कामांबद्दल कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा घेत आहे. ही माझ्या देशाची मालमत्ता असून मी त्याच्याशी तडजोड करणार नाही. प्रत्येक रस्त्यावर माझ्या घराची भिंत आहे. मला माझ्या घराची जितकी काळजी आहे तितकाच मी त्या रस्त्यासाठीही जबाबदार आहे. त्यामुळे मी कामाशी कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असेही गडकरी म्हणाले.