
मुंबईत मागील काही दिवसांपासून उष्ण आणि धुरकट वातावरण होते. त्यानंतर अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. शनिवारी मुंबईच्या हवा गुणवत्तेची श्रेणी ‘समाधानकारक’ नोंदली गेली.
मुंबईचा हवा निर्देशांक 56 इतका म्हणजेच ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदला गेला. मागील काही दिवसांपासून मुंबईची हवा गुणवत्ता प्रामुख्याने ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली जात होती. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पडलेल्या पावसामुळे हवेतील प्रदूषण कमी झाले, धूळ आणि सूक्ष्म कण खाली बसले आणि हवेतील ओलसरपणा वाढल्याने हवेतील गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.
असा होता हवा गुणवत्ता निर्देशांक
वरळी 46, कुलाबा 61, शिवडी 43, भायखळा 37, मुलुंड 34, बोरिवली 60, चेंबूर 55, घाटकोपर 55, अंधेरी 62, वांद्रे 63, शीव 61, कुर्ला 63… या भागांत दिवसभर हवेची गुणवत्ता ‘चांगली’ होती.
गोवंडी-शिवाजी नगर येथील हवा गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. तेथे निर्देशांक 100 च्या पुढे होता.