यूपीआयवरून दररोज 94 हजार कोटींचे व्यवहार

हिंदुस्थानात डिजिटल पेमेंट्स आता अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये यूपीआयवरून दररोज सरासरी 94 हजार कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाले आहे. जे सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत 13 टक्के अधिक आहे. सणासुदीची खरेदी, बोनस आणि डिस्काऊंट यामुळे यूपीआयने दिवाळीच्या पूर्वसंध्येला 740 मिलियन म्हणजेच 74 कोटी ट्रान्झॅक्शन केले.