फेस आयडी, फिंगरप्रिंटने होणार यूपीआय पेमेंट

एनपीसीआय लवकरच यूपीआयमध्ये काही नवीन फिचर आणणार आहे. या नव्या फिचरमुळे यूपीआयवरून पेमेंट करताना पिन नंबरसोबतच आता फेस आयडी किंवा फिंगरप्रिंटने पेमेंट करता येऊ शकणार आहे. हे फिचर सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. हे फिचर लागू करण्याआधी भारतीय रिझर्व्ह बँक आणि अन्य नियामकांकडून मंजुरी घेतली जाईल. नवीन व्यवस्था ओटीपी आणि पिन नंबरच्या तुलनेत अधिक सुरक्षित असेल. यामुळे ऑनलाइन फ्रॉडचा धोका कमी होण्यास मदत होईल.