
ख्रिश्चन नागरिकांना लक्ष्य करून त्यांची हत्या होत असल्याचा आरोप करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियात ‘आयएस’ या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला.त्यात अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. या दहशतवाद्यांना नाताळच्या शुभेच्छा, असे ट्रम्प म्हणाले. नायजेरियामध्ये या वर्षी धार्मिक हिंसा वाढली असून 10 जानेवारी ते 10 ऑगस्ट या कालावधीत सात हजारांपेक्षा जास्त ख्रिश्चनांची हत्या करण्यात आली आहे.





























































