
गर्भवती असलेल्या कर्मचारीला वर्क फ्रॉम होम नाकारून कामावर बोलावल्याने तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अमेरिकेती ओहायो येथी कंपनीला न्यायालयाने सुमारे 200 कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
चेल्सी वॉल्श नावाच्या महिला टोटल क्वालिटी लॉजिस्टिक्स या अमेरिकन कंपनीत काम करत होत्या. फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांनी वर्क फ्रॉम होमची परवानगी मागितली होती. कंपनीने त्यांना ऑफिसमध्ये येऊन काम करण्याचा किंवा पगार नसलेली सुट्टी घेण्याचा पर्याय दिला. नाइलाजाने त्यांना 22 फेब्रुवारीपासून ऑफिसमध्ये जाऊन काम करावे लागले. सलग तीन दिवस काम केल्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी त्यांना अकाली प्रसूती झाली. तिने एका मुलीला जन्म दिला, परंतु जन्मानंतर काही तासांतच तिचा मृत्यू झाला. न्यायालयाने असे मानले की, जर महिलेला घरून काम करण्याची परवानगी दिली असती तर परिस्थिती वेगळी असू शकली असती. याच आधारावर कंपनीवर मोठा दंड ठोठावण्यात आला. हेमिल्टन काऊंटीच्या न्यायालयात हे प्रकरण चालले, जिथे ज्युरीने कंपनीला दोषी ठरवले. जिथे कंपनीला जबाबदार धरून 2.25 कोटी डॉलर देण्याचा आदेश देण्यात आला.























































