तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा झटका, प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली

26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि दहशतवादी हल्ल्यात तब्बल 170 हून अधिक नागरिकांचा बळी घेणारा पाकिस्तानी दहशतवादी तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. राणाने हिंदुस्थानात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दरम्यान, राणाच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यात आल्याची माहिती आज हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी दिली.