
दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुचर्चित चित्रपट ‘रामायण’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भगवान राम यांच्या भूमिकेत अभिनेता रणबीर कपूर दिसणार आहे, तर रावणच्या भूमिकेत केजीएफ स्टार यश दिसणार आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल 1600 कोटी रुपये आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच एआयचा वापर केला जाणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबत अन्य भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित केला जाणार आहे. पहिला भाग 2026 च्या दिवाळीत आणि दुसरा भाग 2027 च्या दिवाळीत प्रदर्शित केला जाणार आहे.