
अमेरिकेचे जगातील सर्वात मोठे विमानवाहू जहाज जेराल्ड आर.फोर्ड हे मध्य पूर्वेकडे रवाना करण्यात आले आहे. इराण-अमेरिका यांच्यातील तणाव वाढलेला असताना हे जहाज मध्य पूर्वेकडे पाठवण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेसोबत वाटाघाटी न झाल्यास इराणला युद्धाला सामोरे जावे लागू शकते. हे जहाज मध्य पूर्वेत पोहोचायला एक आठवडा लागेल. याआधीच अब्राहम लिंकन विमानवाहू जहाज आणि इतर युद्धनौका तैनात करण्यात आल्याने इराणवर दबाव वाढला आहे. हे जहाज आधी कॅरिबियन समुद्रात तैनात होते. या जहाजावर 75 पेक्षा जास्त लष्करी विमाने तैनात केली जाऊ शकतात. अमेरिकेच्या नौदलाकडे एकूण फक्त 11 विमानवाहू जहाजे आहेत.
























































