Hathras Stamped : उत्तर प्रदेशात भीषण दुर्घटना, सत्संगासाठी आलेल्या 27 भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू

उत्तर प्रदेशातून एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका सत्संगासाठी आलेल्या 27 भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मृतांमध्ये 23 महिलांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव पोलीस ठाण्यातील फुलवाई गावात भोले बाबांच्या सत्तसंगात ही चेंगराचेंगरी झाली आहे. त्यात अनेक भाविकांचा मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह येथील एटा मेडीकल कॉलेजमध्ये नेण्यात आले आहेत. एटाचे सीएमओ डॉ. उमेश कुमार त्रिपाठी यांनी 27 जणांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मृतांमध्ये तेवीस महिलांसह 3 मुलं आणि एका पुरुशाचा समावेश आहे.

प्रत्यक्षदर्शी राकेश प्रताम सिंह म्हणाले की, भोले बाबांच्या सत्संगामध्ये हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव पोलीस स्टेशन परिसरातील फुलराई गाब येथे भोले बाबांचा सत्संग संपल्यानंतर चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना घडली आहे.. चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तर अनेकजण यात जखमी झाले तर जखमींना एटा मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस जिल्ह्यातील अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. त्याबाबत त्यांच्या कार्यालयाकडून ट्विट करण्यात आले आहे.