उत्तर प्रदेशमध्ये ट्रेनचा अपघात, इंजिनपासून निसटले आठ डब्बे; सुदैवाने जिवीतहानी नाही

उत्तर प्रदेशमध्ये ट्रेनचा एक विचित्र अपघात झाला आहे. किसान एक्सप्रेसचे आठ डबे इंजिनपासून निसटले आहेत. हे आठ डबे काही वेळ रुळांवर धावत होते आणि नंतर थांबले. त्यात इंजिन पुढेच धावत होते. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली असून रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जेव्हा हे आठ डबे इंजिनपासून वेगळे झाले तेव्हा ट्रेना वेग हा ताशी 80किमी इतका होता.

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या मुरादाबाच्या पुढे स्योहारा आणि धामपुर स्टेशनजवळ हा अपघात झाला. चकरामल गावाजवळ S3 आणि S4 डब्ब्यांना जोडणारी बोगीची कपलिंग तुटली. त्यामुळे इंजिन 13 डबे घेऊन पुढे गेले आणि बाकीचे चार डबे मागेच राहिले. या दरम्यान ड्रायव्हर आणि गार्ड्सचा कुठलाच संपर्क झाला नाही, त्यामुळे हा अपघात झाल्याचे लक्षात आले.

या गाडीमध्ये पोलीस भरतीसाठी निघालेले विद्यार्थी होते. पोलिसांनी तातडीने या विद्यार्थ्यांना दुसऱ्या मार्गने त्यांच्या परीक्षेच्या केंद्रावर सोडून दिले. तांत्रिक कारणांमुळे हा अपघात झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. ज्यावेळी हे डबे इंजिनपासून सुटले तेव्हा इतर कुठलीही गाडी इथून धावत नव्हती. अन्यथा मोठा अपघात झाला असता.