
उत्तरकाशीत धरालीजवळ ढगफुटी झाली. ढगफुटीनंतर आलेल्या पुरामध्ये अनेक घरे, हॉटेल्स, लॉज सर्वकाही वाहून गेले. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेला दोन तासही उलटले नाहीत तोच उत्तरकाशीत ढगफुटीची दुसरी घटना घडली आहे. धरालीजवळील सुखी टॉपवर ही ढगफुटी झाली असून यात अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, धरालीमध्ये आलेल्या पुरात अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत. निसर्गाच्या कोपामुळे धरालीतील जनजीवन बाधित झाले आहेत. एसडीआरएफ, एनडीआरएफ, बचाव पथके घटनास्थळी दाखल झाल्या असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
मदत आणि बचाव कार्य जलदगतीने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. बाधित लोक आणि त्यांचे कुटुंब मदतीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात – 01374222126, 01374222722 आणि 9456556431.
उत्तराखंडची राजधानी देहरादूनपासून 220 किमी अंतरावर गंगोत्री धामजवळ ही ढगफुटीची घटना घडली आहे. आहे. धराली गाव हे हर्षिलपासून गंगोत्रीच्या दिशेने सुमारे 6 ते 7 किमी अंतरावर खीर गंगा नदीजवळ आहे.