Vadhavan Protest – सलग दुसऱ्या दिवशी पोलीस बळाचा वापर करून वाढवण बंदराचे सर्वेक्षण, गावकऱ्यांच्या संतापाचा स्फोट

पालघरमधील डहाणूमध्ये वाढवण बंदराविरोधात गावकरी आक्रमक झाले आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी पोलीस बळाचा वापर करून वाढवण बंदराचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. यामुळे गावकऱ्यांच्या संतापाचा स्फोट झाला आहे.

डहाणूत उग्र आंदोलन! चोरी चुपके ड्रोन सर्व्हे हाणून पाडला

आमच्याच गावात आम्हाला बंदी घालताय काय? असे गावकऱ्यांनी प्रशासनाला सुनावले. या दडपशाही विरोधात वाढवणवासियांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. सर्वेक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर गावकऱ्यांनीही सर्वेक्षण रोखण्यासाठी आक्रमक झाले आहेत.