आयपीएल नव्हे द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा आनंद जास्त

अगदी कुमार वयातच मला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळते आहे याचा मला आनंद आहे. मात्र आयपीएलमध्ये खेळण्यापेक्षा हिंदुस्थानचे दिग्गज फलंदाज राहुल द्रकिड यांच्या मार्गदर्शनाखाली मी खेळणार असल्याचा मला जास्त आनंद आहे, असे मत हिंदुस्थानचा कुमार स्फोटक फलंदाज कैभक सूर्यकंशीने क्यक्त केले. मी राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यासाठी अधिक उत्सुक आहे, असेही तो म्हणाला.गेल्या महिन्यात झालेल्या आयपीएलच्या लिलाकात 13 कर्षीय वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्स संघाने किकत घेतले. त्यामुळे सर्वात कमी वयात आयपीएल खेळण्याचा मान वैभवने पटकाकला आहे. 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत आपल्या तुफान फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा कैभक आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांपुढे कशी फलंदाजी करतो याकडे क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आयपीएलमधील निकडीबाबत वैभव म्हणाला, आयपीएलसाठी माझ्याकडे कोणतीही रणनीती नाही. मी जसा खेळतो तसाच आयपीएलमध्ये खेळणार आहे.