
जम्मू-कश्मीरमधील अनेक मार्गांवर पाऊस आणि भूस्खलन झाल्यामुळे 26 ऑगस्टपासून स्थगित असलेली वैष्णो देवी यात्रा 14 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार होती, परंतु या मार्गांवर पुन्हा एकदा पाऊस पडल्याने ही यात्रा पुन्हा स्थगित करावी लागली आहे. भवन आणि यात्रा मार्गावर लागोपाठ पाऊस पडल्याने वैष्णो देवी यात्रा पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती वैष्णो देवी ट्रस्ट यांनी दिली आहे.