
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित युवासेना उपसचिव प्रथमेश सकपाळ यांच्या वतीने ‘आदित्योत्सव 2025’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ महिलांसाठी एक दिवसाची धार्मिक सहल, रहिवाशांसाठी मानसिक आरोग्य या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप, दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार, गरजूंना छत्रीवाटप, संपूर्ण विभागात स्वच्छता मोहीम अशा कार्यक्रमांचे आयोजन ‘आदित्योत्सव 2025’ मध्ये करण्यात आले आहे.