
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघाताची घटना शनिवारी घडली. खोपोलीजवळ बोरघाटातील बोगद्यात 7 ते 8 वाहने एकमेकांवर धडकली. अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, रुग्णवाहिका, देवदूत यंत्रणा आणि हेल्प फाऊंडेशन सदस्य घटनास्थळी दाखल झाले.
अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. जखमी प्रवाशांना उपचारासाठी खोपोली नगरपालिका आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे घाटात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. महामार्ग पोलीस क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.