
रंगीला, तेजाब, वास्तव, थ्री इडियट, लगे रहो मुन्नाभाई. फेरारी की सवारी अशा बॉलीवूडच्या गाजलेल्या चित्रपटांत भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार (91) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांचे निधन झाले. उद्या, मंगळवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल 125 बॉलिवूड चित्रपट, 95 मालिका आणि 26 नाटकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत भूमिका साकारली होती.