डॉ. मीना प्रभू यांचे निधन

प्रवासवर्णनाच्या लेखनातून मराठी वाचकांना देशोदेशीची सफर घडवणाऱ्या आणि या लेखन प्रकाराला वाङ्मयीन प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना सुधाकर प्रभू यांचे अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.