
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव धनकड यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. धनकड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार मी संविधानाच्या कलम 67(अ) नुसार तात्काळ देशाच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे, असे जगदीप धनकड यांनी पत्रात म्हटले आहे.