
एका काका-काकूंचा डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका कौटुंबिक कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात सगळे पाहुणे शांत बसलेले असताना अचानक काका आणि कापू स्टेजवर येतात अन् अफलातून डान्स करतात. काका-काकूंचा डान्स पाहून सर्व जण अवाक होतात. इतका भन्नाट ते डान्स करतात. एखाद्या हिरोलाही लाजवेल असा काकूंसोबत डान्स करतात. या व्हिडीओमध्ये दोघेही आनंदी दिसत आहेत. त्यांच्या डोळ्यात प्रेम आणि चेहऱ्यावर मस्त हसू दिसत आहे. काका-काकूंचा डान्स पाहून सगळे जण थक्क होतात आणि जोरजोरात टाळ्या वाजवतात. या व्हिडीओला हजारो युजर्सनी शेअर केले असून लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.






























































