आठ तासांच्या शिफ्टवर विद्या बालनचा दीपिकाला पाठिंबा

अभिनेत्री दीपिका पदुकोणमुळे इंडस्ट्रीतील आठ तासांच्या शिफ्टचा विषय चर्चेत आहे. आता विद्या बालन हिनेही या मुद्द्यावर आपले मत मांडले. विद्या बालन म्हणाली, ‘‘आजकाल प्रत्यक्ष क्षेत्रात महिलांच्या शिफ्टमध्ये सूट दिली जात आहे. मग फिल्म इंडस्ट्री का मागे राहिली? एका आईला काम आणि कुटुंब यात ताळमेळ साधावा लागतो. त्यामुळे कामाच्या तासांमध्ये सवलत दिलीच पाहिजे.’’