
राज्य सरकारने तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी पुरवठा विभाग, मुंबईचे सह सचिव बापू पवार यांची महाराष्ट्र वैद्यकीय वास्तू खरेदी प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तसेच महेश आव्हाड यांची महाराष्ट्र वैद्यकीय वास्तू खरेदी प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे.


























































