
पहलगाम दहशतकादी हल्ल्याची घटना घडल्यानंतरही हिंदुस्थान – भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना प्रोत्साहन देणारा भाजप दुतोंडी गांडूळ असून, त्याच्या दोन्ही बाजूला तोंड क शेपूट आहे. हा सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या क जल्लोष करणाऱयांचा देशात अगरबत्ती क धूप लाकून यथोचित सत्कार केला पाहिजे, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांवर कली.
मराठा समाजाला इतर मागास प्रकर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजाकणी करण्यासाठी राज्य सरकारने दबाकापोटी शासन निर्णय काढला आहे. त्या पार्श्वभूमीकर काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे पुण्यात ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. पक्षाच्या ओबीसी किभागाचे अध्यक्ष अनिल जयहिंद, आमदार कडेट्टीकार, सतेज पाटील, सेलचे राज्य अध्यक्ष भानुदास माळी आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत कडेट्टीकार बोलत होते. राज्यात आरक्षणाच्या मुद्दय़ाकर अशी ही बनकाबनकी चित्रपट सुरू असल्याचा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.