विजयपत सिंघानिया अनंतात विलीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील आघाडीची टेक्स्टाईल कंपनी ‘रेमंड’ला ‘द कम्प्लिट मॅन’ची ओळख बनवणारे उद्योगपती व रेमंडचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. आज दुपारी 3 वाजता चंदनवाडी स्मशानभूमीवर त्यांचा मुलगा व रेमंडचे विद्यमान अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी मुखाग्नी दिला. यावेळी सिंघानिया कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

गौतम सिंघानिया यांची पत्नी नवाज मोदी यांनी विजयपत सिंघानिया यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये काळजी घेतली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून त्यांची प्रकृती खालावत गेली, असे नवाज मोदी यांनी सांगितले. विजयपत सिंघानिया यांच्या अंत्यविधीला हवाई दलातील अधिकारी तसेच बॉलीवूडमधील काही सेलिब्रिटी उपस्थित होते.