
वाढदिवशी कामात व्यस्त असलेल्या एका झोमॅटो रायडरचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एका ग्राहकाने त्यांचा वाढदिवस साजरा करून लाखो नेटकऱयांचे मन जिंकले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ग्राहकाच्या कुटुंबाने झोमॅटो डिलिव्हरी एजंटचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने पण आपुलकीने साजरा केला. ग्राहकांने केक मागवला आहे. मेणबत्ती पेटवून केकवर लावली आहे. उपस्थित मंडळी टाळ्य़ा वाजवतात आणि हॅपी बर्थडे म्हणत आहे. हे सगळं पाहून झोमॅटो डिलिव्हरी एजंट थक्क झालेला दिसत आहे. ग्राहकांनी त्याचा वाढदिवस साजरा केलेला पाहून त्याच्या डोळय़ात पाणी दाटले आहे.

























































