
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली गेल्या वर्षभरापासून आपल्या कुटुंबीयांसोबत परदेशात स्थायिक झाला आहे. आपल्या संघाचे सामने खेळण्यासाठी तो हिंदुस्थानात येतो आणि पुन्हा लंडनला रवाना होतो. यामुळे सोशल मीडियावर किंग कोहलीची चर्चा असते. दोन महिन्यांपूर्वीच जानेवारीत शेवटचा वनडे सामना खेळल्यानंतर तो पुन्हा लंडनला निघून गेला. दरम्यान आता सुरू असलेल्या IPL च्या सामन्यांसाठी तो पुन्हा हिंदुस्थानात आला. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला परदेशी खेळाडू उपमा दिली जात आहे. IPL 2026 च्या RCB संघातील पाचवा विदेशी खेळाडू म्हणून ट्रोल केले जात आहे.
View this post on Instagram
दरम्यान विराटने एका मुलाखतीच्या माध्यमातून या ट्रोलर्सना सडेतो़ड उत्तर दिले आहे. आरसीबीच्या एका व्हिडिओमध्ये ‘मिस्टर नॅग्स’ म्हणजेच दानिश सैत सोबत संवाद साधताना विराटने या ट्रोलर्सची चांगलीच फिरकी घेतली. “लोक म्हणतायत की आरसीबी 5 परदेशी खेळाडू खेळवत आहे, मला समजत नाहीये की त्यांना नक्की काय म्हणायचं आहे? हा प्रश्न ते मला का विचारतात? विदेशी खेळाडूंना असे प्रश्न विचारावे? मी विदेशी खेळाडू आहे का? अशा शब्दांत त्याने नेटकऱ्यांना टोला लगावला. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
IPL च्या सामन्यात 18 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर गेल्या वर्षी RCB ने IPL 2025 ची ट्रॉफी आपल्या नावे केली. या यशाबद्दल बोलताना विराट भावूक झाला. इतकी वर्षे खांद्यावर असलेले ओझे आता उतरल्यासारखे वाटतेय. त्या रात्री जेतेपद जिंकल्यानंतर मला मनातून खूप हलके वाटले, असे तो म्हणाला.
आरसीबीच्या यशाने विराटचा आनंद द्विगुणित झाला असून तो आता पूर्ण जोशात खेळण्यासाठी सज्ज आहे. RCB ने पहिल्याच सामन्याच खाते उघडले. 28 मार्चला झालेल्या पहिल्याच सामन्यात हैदराबादचा धुव्वा उडवित आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 19 व्या हंगामात विजयारंभ केला. या लढतीत बंगळुरूने हैदराबादचा ६ फलंदाज आणि 26 चेंडू राखून पराभव केला. या सामन्यात 32 चेंडूत 69 धावा केल्या होत्या.





























































