
स्वातंत्र्य दिनानिमित्त विस्तारा एअरलाईन्सने फ्रीडम सेलची घोषणा केली आहे. या सेल अंतर्गत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या तिकिटावर मोठी सूट दिली जात आहे. पश्चिम बंगालच्या बागडोगरा ते आसामच्या डिब्रूगढसाठी इकोनॉमी क्लासचे सर्वात स्वस्त तिकीट 1578 रुपयांत उपलब्ध करण्यात आले आहे. मुंबई ते अहमदाबादसाठी प्रीमियम इकॉनॉमी क्लासचे तिकीट 2678 रुपये आणि बिझनेस क्लासचे तिकीट 9978 रुपयात मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठीच्या तिकिटाची किंमत 11,978 रुपयांपासून सुरू होते. दिल्ली ते काठमांडूसाठी इकॉनॉमी क्लासचे तिकीट याच किंमतीत उपलब्ध आहे. प्रीमियम इकॉनॉमी क्लासचे तिकीट 13,978 रुपये आणि बिझनेस क्लासचे तिकीट 46,978 रुपयात मिळेल. ही ऑफर 15 ऑगस्टच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत वैध आहे. तिकीट बूक करण्यात आलेल्या तिकिटावर 31 ऑक्टोबर पर्यंत प्रवास करता येऊ शकतो. तिकीट बुकिंगसाठी विस्ताराची अधिकृत वेबसाईट www.airvistara.com वर सविस्तर माहिती मिळेल.
काय आहे ऑफर
विस्तारा एअरलाईन्स कंपनीची ही ऑफर अबू धाबी, बाली, बँकॉक, कोलंबो, दम्मम, ढाका, दुबई, दोहा, फ्रँकफर्ट, हाँगकाँग, जेद्दा, काठमांडू, लंडन, माले, मॉरीशस, मस्कट, सिंगापूर आणि पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणावर सुद्धा आहे. ही सूट निवडक मार्गावर लागू असेल.